मा. श्री. दौलत उमाजी शितोळे.
संस्थापक अध्यक्ष
आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य
नमस्कार.. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान तसेच Disaster Management Organization चे प्रमुख..मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके ग्रहमंत्री व उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून मी दौलत उमाजी शितोळे. आपत्ती व्यवस्थापन संघ मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. 12/12/2012 रोजी आमच्या संस्थेची पायाभरणी आदरणीय मा. श्री. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारें यांच्याकडून शिंदोडी या माझ्या मूळ गावी झाली.. समाजसेवेचा वसा जणू काही अण्णांच्याच कृतीतून मिळाला याचा सार्थ अभिमान वाटतो.. गेली दहा वर्ष संस्थेच्या माध्यमातून स्वतःची एक Disaster Rescue Force तयार करून रस्ते महामार्ग या वरील शेकडो अपघात ग्रस्त लोकांस तात्काळ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.माळीण दुर्घटना असो, सांगलीतील पुरजन्य परिस्थिती असो.. नाहीतर उत्तराखंड मधील सर्वात मोठी दुर्घटना माझ्या टीम मधील सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करत आपले कर्तव्य चोख बजवले.या बद्दल सर्व सहकार्याचे देखील आभार..
थोडंसं आपत्ती व्यवस्थापन बद्दल…
Awards
मा. श्री. दौलत उमाजी शितोळे
Millionaire Lifestyle Award
द मिलेनियर क्लब दुबई यांच्या वतीने दिला जाणारा मिलेनियर लाईफ स्टाईल अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा आज दुबई येथे संपन्न झाला. लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या “आपत्ती व्यवस्थापन संघाच्या” माध्यमातून हजारो लोकांचे जीव वाचविण्याचे कार्य केले याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचा गौरव केल्याबद्दल मिलेनियर क्लब दुबई यांचे शतशः आभार. आज पर्यंत आपत्ती व्यवस्थापन संघ या संस्थेच्या माध्यमातून अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असताना हजारो लोकांना जीवदान देण्याचे काम या संस्थेने केले आहे. उत्तराखंड येथील भूस्खलनामध्ये तब्बल 4000 लोकांचे जीव संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्राणाची बाजी लावून वाचविले तसेच 2019 साली सांगली येथे आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघाचे अनेक स्वयंसेवक त्या ठिकाणी कार्यरत होते माळीन सारख्या नैसर्गिक आणि दुर्दैवी घटनेमध्ये रेस्क्यू करून 300 हून अधिक बेवारस मृतदेहांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करणे तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये मृतदेहाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची मदत करण्यात संस्था नेहमी अग्रेसर असते.अनेक ठिकाणी गुन्ह्यांची उकल करत असताना प्रशासनास प्रचंड अडचणी येतात परंतु आपत्ती व्यवस्थापन संघाचे प्रशिक्षित स्वयंसेवक या कामांमध्ये स्वतःला झोकून देऊन अतिशय सफाईदारपणे ही कामे पार पाडतात. आजही नागरी समस्यांच्या बाबतीमध्ये रोड अपघात या समस्येने अत्यंत भयानक स्वरूप धारण केलेले असताना आपत्ती व्यवस्थापन संघाचे स्वयंसेवक रोड अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटल पर्यंत पोहोचविणे. अपघात होऊ नयेत यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे अशी अनेक कामे संस्थेच्या माध्यमातून सातत्याने चालू आहेत.2012 साली लावलेले हे इवलेसे रोपटे आज इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपात उभे आहे. भविष्यातही आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या ठिकाणी आपल्या प्राणाची बाजी लावून सर्वसामान्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघ नेहमीच कटिबद्ध राहील.रॅमी डाउन टाउन हॉटेल दुबई या पुरस्काराचे वितरण आज संपन्न झाले.आजही अपघातग्रस्तांना मदत आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. समाजाला आपण काही देणे लागतो या भावनेतून काम करत असताना पुरस्कार निश्चितच दहा हत्तीच बळ देऊन जातात.

दिनांक 28 जानेवारी रोजी दुबई अबू धाबी येथे आर्थिक राजनय गोलमेज परिषद संपन्न झाली. युनायटेड डिप्लोमॅटिक कौन्सिल (UDC) यांच्या वतीने अबू धाबी येथे आयोजित या परिषदेत क्यूबा, ग्वाटेमाला, तिमोर-लेस्ते, सिंगापूर, माल्टा, पोलंड, आयव्हरी कोस्ट, सिएरा लिओन आणि संयुक्त अरब अमीरात येथील राजदूत, राजनयिक आणि मानद व्यापार आयुक्त सहभागी झाले होते.यावेळी एससीओ–यूएई व्यापार आणि रणनीतिक कनेक्टिविटीवर सखोल चर्चा झाली.या परिषदेस एससीओ ट्रेड काउंसिल (भारत) चे मानद व्यापार आयुक्त निखिल कुमार गोयल, सेवानिवृत्त अधिकारी अविनाश कांबळे साहेब, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते.दौलतनाना शितोळे साहेब यांच्यासह संपूर्ण जगभरातून आलेले उद्योजक विविध राजनैतिक अधिकारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आपत्ती म्हणजे काय?
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.
तथापी आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होत नाही.. तरी शक्य ती अपादग्रसतांना आवश्यक ती मदत करणे..व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे,आणि त्याचे निराकरण करणे म्हणजे ‘आपत्ती व्यवस्थापन’ होय.
हे सर्व आपण जाणताच..
परंतु हे फक्त क्रमिक पुस्तकात न वाचता ते कृतीत आणण प्रत्येक भारतीयाच कर्तव्य आहे.. यात तिळमात्र शंका नाही.. परिस्थिती कोणतीही असो प्रामाणिक पणा, सामाजिक जाण,योग्य नेतृत्व, आणि सर्वात महत्वाचे..
निःस्वार्थ सेवा.. या सर्व गुणांचा त्रिवेणी संगम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन संघ संचालित आमची. Disaster Rescue force आणि मला याचा अभिमान आहे याच नेतृत्व करण्याचं काम मी गेली दहा वर्ष प्रामाणिक पणे करत आहे.