Help Line No. +91 - 9325789866

मा. श्री. दौलत उमाजी शितोळे.
संस्थापक अध्यक्ष
आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य

नमस्कार.. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान तसेच   Disaster Management Organization चे प्रमुख..मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके ग्रहमंत्री व उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून मी दौलत उमाजी शितोळे. आपत्ती व्यवस्थापन संघ मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. 12/12/2012 रोजी आमच्या संस्थेची पायाभरणी आदरणीय मा. श्री. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारें यांच्याकडून शिंदोडी या माझ्या मूळ गावी झाली.. समाजसेवेचा वसा जणू काही अण्णांच्याच कृतीतून मिळाला याचा सार्थ अभिमान वाटतो.. गेली दहा वर्ष संस्थेच्या माध्यमातून स्वतःची एक Disaster Rescue Force तयार करून रस्ते महामार्ग या वरील शेकडो अपघात ग्रस्त लोकांस तात्काळ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.माळीण दुर्घटना असो, सांगलीतील पुरजन्य परिस्थिती असो.. नाहीतर उत्तराखंड मधील सर्वात मोठी दुर्घटना माझ्या टीम मधील सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करत आपले कर्तव्य चोख बजवले.या बद्दल सर्व सहकार्याचे देखील आभार..
थोडंसं आपत्ती व्यवस्थापन बद्दल.. Read More

Image Gallery

Latest Update

  • दिनांक ३०/०७/२०१४ ते ०३/०८/२०१४ रोजी माळीन ता. आंबेगाव जि. पुणे
  • दिनांक ३१ /०२ /२०२० ते १५ /०३ /२०२० रोजी कोरोना काळामध्ये श्री. दौलतनाना उमाजी शितोळे यांनी स्वखर्चाने सुमारे ५००० गरीब गरजू लोकांना कोरोना प्रतिबंधक औषध, अन्यधान्य, भाजीपाला, मोफत वाटप करण्यात आला.

Video Gallery

Awards

मा. श्री. दौलत उमाजी शितोळे
Millionaire Lifestyle Award

द मिलेनियर क्लब दुबई यांच्या वतीने दिला जाणारा मिलेनियर लाईफ स्टाईल अवॉर्ड पुरस्कार वितरण सोहळा आज दुबई येथे संपन्न झाला. लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांच्या “आपत्ती व्यवस्थापन संघाच्या” माध्यमातून हजारो लोकांचे जीव वाचविण्याचे कार्य केले याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेचा गौरव केल्याबद्दल मिलेनियर क्लब दुबई यांचे शतशः आभार. आज पर्यंत आपत्ती व्यवस्थापन संघ या संस्थेच्या माध्यमातून अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत असताना हजारो लोकांना जीवदान देण्याचे काम या संस्थेने केले आहे. उत्तराखंड येथील भूस्खलनामध्ये तब्बल 4000 लोकांचे जीव संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्राणाची बाजी लावून वाचविले तसेच 2019 साली सांगली येथे आलेल्या महापुरामध्ये हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघाचे अनेक स्वयंसेवक त्या ठिकाणी कार्यरत होते माळीन सारख्या नैसर्गिक आणि दुर्दैवी घटनेमध्ये रेस्क्यू करून 300 हून अधिक बेवारस मृतदेहांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार करणे तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये मृतदेहाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाची मदत करण्यात संस्था नेहमी अग्रेसर असते.अनेक ठिकाणी गुन्ह्यांची उकल करत असताना प्रशासनास प्रचंड अडचणी येतात परंतु आपत्ती व्यवस्थापन संघाचे प्रशिक्षित स्वयंसेवक या कामांमध्ये स्वतःला झोकून देऊन अतिशय सफाईदारपणे ही कामे पार पाडतात. आजही नागरी समस्यांच्या बाबतीमध्ये रोड अपघात या समस्येने अत्यंत भयानक स्वरूप धारण केलेले असताना आपत्ती व्यवस्थापन संघाचे स्वयंसेवक रोड अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना हॉस्पिटल पर्यंत पोहोचविणे. अपघात होऊ नयेत यासाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे अशी अनेक कामे संस्थेच्या माध्यमातून सातत्याने चालू आहेत.2012 साली लावलेले हे इवलेसे रोपटे आज इतक्या भव्य आणि दिव्य स्वरूपात उभे आहे. भविष्यातही आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींच्या ठिकाणी आपल्या प्राणाची बाजी लावून सर्वसामान्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघ नेहमीच कटिबद्ध राहील.रॅमी डाउन टाउन हॉटेल दुबई या पुरस्काराचे वितरण आज संपन्न झाले.आजही अपघातग्रस्तांना मदत आपल्या संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. समाजाला आपण काही देणे लागतो या भावनेतून काम करत असताना पुरस्कार निश्चितच दहा हत्तीच बळ देऊन जातात.

दिनांक 28 जानेवारी रोजी दुबई अबू धाबी येथे आर्थिक राजनय गोलमेज परिषद संपन्न झाली. युनायटेड डिप्लोमॅटिक कौन्सिल (UDC) यांच्या वतीने अबू धाबी येथे आयोजित या परिषदेत क्यूबा, ग्वाटेमाला, तिमोर-लेस्ते, सिंगापूर, माल्टा, पोलंड, आयव्हरी कोस्ट, सिएरा लिओन आणि संयुक्त अरब अमीरात येथील राजदूत, राजनयिक आणि मानद व्यापार आयुक्त सहभागी झाले होते.यावेळी एससीओ–यूएई व्यापार आणि रणनीतिक कनेक्टिविटीवर सखोल चर्चा झाली.या परिषदेस एससीओ ट्रेड काउंसिल (भारत) चे मानद व्यापार आयुक्त निखिल कुमार गोयल, सेवानिवृत्त अधिकारी अविनाश कांबळे साहेब, जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते.दौलतनाना शितोळे साहेब यांच्यासह संपूर्ण जगभरातून आलेले उद्योजक विविध राजनैतिक अधिकारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आपत्ती म्हणजे काय?

आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.

तथापी आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होत नाही.. तरी शक्य ती अपादग्रसतांना आवश्यक ती मदत करणे..व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे,आणि त्याचे निराकरण करणे म्हणजे ‘आपत्ती व्यवस्थापन’ होय.
हे सर्व आपण जाणताच..
परंतु हे फक्त क्रमिक पुस्तकात न वाचता ते कृतीत आणण प्रत्येक भारतीयाच कर्तव्य आहे.. यात तिळमात्र शंका नाही.. परिस्थिती कोणतीही असो प्रामाणिक पणा, सामाजिक जाण,योग्य नेतृत्व, आणि सर्वात महत्वाचे..
निःस्वार्थ सेवा.. या सर्व गुणांचा त्रिवेणी संगम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन संघ संचालित आमची. Disaster Rescue force आणि मला याचा अभिमान आहे याच नेतृत्व करण्याचं काम मी गेली दहा वर्ष प्रामाणिक पणे करत आहे.

एक हात मदतीचा निस्वार्थ सेवा

आज दि-4-11-2025 रोजी पुणे अहिल्यानगर रोडवर तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी श्री गोविंद गेनोजी कांचन यांचा भिषण अपघात झाला होता. हे निदर्शनास येताच बहुजन नेते आणि आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक लोकनेते दौलतनाना शितोळे यांचे बंधू राम शितोळे आपल्या आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना मदत केली व स्वतःच्या गाडीतून नेऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

लोकनेते दौलतनाना शितोळे साहेब यांची एनजीओ संस्था, आपत्ती व्यवस्थापन संघाच्या माध्यमातून राज्यभर अशा अपघातग्रस्त, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती मध्ये मोठ्या प्रमाणावर निःस्वार्थ काम सुरू आहे.

काल आपत्ती व्यवस्थापन संघ शिंदोडी येथे ज्येष्ठ उद्योगपती धर्मेश जी यांनी सदिच्छा भेट दिली.12/12/2012 रोजी या आपत्ती व्यवस्थापन संघाची स्थापना झाली आणि निस्वार्थ मानव सेवेचे हे महान कार्य चालू झाले आजपर्यंत मुंबई पुणे महामार्ग पुणे अहिल्यानगर महामार्ग पुणे सोलापूर महामार्ग पुणे सातारा महामार्ग या महामार्गांवर तसेच उत्तराखंड येथील भूस्खलन,माळीन येथील दुर्घटना सांगली कोल्हापूर येथील महापूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये सुद्धा हजारो जीव वाचविण्याचे काम या आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कमांडोंनी केले आहे. याची माहिती त्यांना दिली.या सर्व कामगिरीबद्दल त्यांनी आपत्ती व्यवस्थापन संघाच्या सर्व सदस्यांचे कौतुक केले.यापुढेही या सर्व महामार्गांसोबतच मुंबई गोवा महामार्ग मुंबई कोस्टल रोड येथे आपत्ती व्यवस्थापन संघाचे कमांडो अगदी अल्पकालावधीमध्ये हे काम पुढे चालू ठेवण्यासाठी तैनात होणार आहेत. ज्या तरुणांना देशसेवेची समाजसेवेची आवड आहे अशा तरुणांनी या आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक लोकनेते दौलतनाना शितोळे याने करण्यात येत आहे

संकटकाळी_विश्वासाचे_नाव_आपत्ती_व्यवस्थापन_संघ
लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन संघाचे कमांडो नेहमीच आपत्तीमध्ये सर्वांची मदत करतात याचा आज पुन्हा एकदा प्रत्यय आला वाळवणे ता. पारनेर जि. अहिल्यानगर येथील रामकिसन राजाराम गायकवाड हे गेल्या तीन चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला परंतु ते कुठेही आढळले नाहीत यावेळी त्यांचे बंधू लक्ष्मण गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन संघाला संपर्क केला आणि आपत्ती व्यवस्थापन संघाच्या टीमला या ठिकाणी पाचारण केले. कमांडो नी शोध घेतला असता ते विहिरीत पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले यावेळी आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कमांडोनी प्रयत्नांची शर्थ करून सुखरूपपणे त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला आणि त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्त केला.

#आपत्ती_व्यवस्थापन_संघ #जीवरक्षक

दिनांक 8/01/2026 कैलास मारुती गायकवाड रा.निमोणे वय 60 यांचा निमोणे करडे रोडवर भीषण अपघात झाला. अपघातामध्ये कैलास मारुती गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. ही बातमी लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन संघाला कळविण्यात आली.आपत्ती व्यवस्थापन संघाच्या सदस्यांनी तातडीने या ठिकाणी दाखल होत गायकवाड यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि पुढील उपचारासाठी त्यांना डॉक्टरांकडे सुपूर्द केले.

DISASTER RESCUE FORCE
काल दिनांक 13/03/2026 रोजी पुणे ते नागपूर एकूण 27 प्रवासी घेऊन जाणारी ट्रॅव्हल बस हिला रांजणगाव महागणपती येथे अचानक आग लागली ही बातमी समजताच आपत्ती व्यवस्थापन संघाचे सर्व टीम मेंबर तेथे दाखल होऊन झालेल्या घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड गोंधळ तसेच ट्रॅफिक ची समस्या निर्माण झाली होती त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघ च्या सर्व कमांडोंनी तत्परता दाखवत पोलीस प्रशासनास मदत केली.

DISASTER RESCUE FORCE responded promptly to an emergency on 13/03/2026 when a travel bus carrying 27 passengers from Pune to Nagpur caught fire at Ranjangaon Mahaganapati. The team members arrived at the scene, managing the chaos and traffic congestion caused by the incident, and assisted the police administration in restoring order.

दिनांक 25/03/2026
सायंकाळी 7:35 घटना घडली
कारेगाव करडे रोडवर घरी जात असताना चंद्रकांत दिवेकर या व्यक्तीस अज्ञान वाहनाकडून धडक बसली ही माहिती समजताच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलत नाना शितोळे
यांच्या मार्गदर्शनाखाली
Disaster rescue force त्या ठिकाणी तात्काळ दाखल झाले सदर व्यक्तीस तात्काळ कारेश्वर कारेगाव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आज दिनांक 03/04/2026,पुणे- नगर हायवे तसेच कारेगाव व रांजणगाव गणपती या ठिकाणी फोर्स च्या टीम ने वाहनांचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी निस्वार्थ सेवा केली व पोलिस प्रशासनाला मदत केली .

आज रविवार दिनांक 05/04/2026 रोजी आपत्ती व्यवस्थापन संघाचे कमांडो शिक्रापूर या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोल करत असताना दोन टेम्पो वाहनांचा अपघात झाला त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन संघ तात्काळ हजर होऊन अपघातग्रस्त व्यक्ति प्रणित राजेश कुमखेळे याला सूर्य हॉस्पिटल शिक्रापूर या ठिकाणी तात्काळ दाखल केले.

आज दिनांक 10/04/2026,पुणे- नगर हायवे तसेच शिक्रापूर चाकण चौक या ठिकाणी फोर्स च्या टीम ने वाहनांचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी निस्वार्थ सेवा केली व पोलिस प्रशासनाला मदत केली .

आज दिनांक- 12/04/2026 रोजी देवदैठण तालुका-श्रीगोंदा जिल्हा-अहिल्यानगर या ठिकाणी पाण्याने भरलेल्या बंधाऱ्यात एक व्यक्ती बुडाला असून ही माहिती तेथील सरपंच यांनी आपत्ती व्यवस्थापन संघाचे संस्थापक दौलत नाना शितोळे यांना दिल्यानंतर ताबडतोब त्यांची रेस्क्यू फोर्स टीम त्या ठिकाणी पोहचले असून बॉडी पाण्याबाहेर काढून पीएम साठी शिरूर या ठिकाणी नेण्यात आले. मयत व्यक्तीचे नाव-अमित रंगनाथ साठे . राहणार-देवदैठण. वय-42 मो.नं- 9881039977

Call Now Button