मा. श्री. दौलत उमाजी शितोळे.
संस्थापक अध्यक्ष
आपत्ती व्यवस्थापन संघ महाराष्ट्र राज्य
नमस्कार.. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान तसेच Disaster Management Organization चे प्रमुख..मा. श्री. नरेंद्र मोदी साहेब तसेच आपल्या महाराष्ट्रातील सर्वांचे लाडके ग्रहमंत्री व उप मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणेतून मी दौलत उमाजी शितोळे. आपत्ती व्यवस्थापन संघ मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. 12/12/2012 रोजी आमच्या संस्थेची पायाभरणी आदरणीय मा. श्री. जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारें यांच्याकडून शिंदोडी या माझ्या मूळ गावी झाली.. समाजसेवेचा वसा जणू काही अण्णांच्याच कृतीतून मिळाला याचा सार्थ अभिमान वाटतो.. गेली दहा वर्ष संस्थेच्या माध्यमातून स्वतःची एक Disaster Rescue Force तयार करून रस्ते महामार्ग या वरील शेकडो अपघात ग्रस्त लोकांस तात्काळ हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले.माळीण दुर्घटना असो, सांगलीतील पुरजन्य परिस्थिती असो.. नाहीतर उत्तराखंड मधील सर्वात मोठी दुर्घटना माझ्या टीम मधील सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्येक सूचनांचे पालन करत आपले कर्तव्य चोख बजवले.या बद्दल सर्व सहकार्याचे देखील आभार..
थोडंसं आपत्ती व्यवस्थापन बद्दल.. Read More
आपत्ती म्हणजे काय?
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.
तथापी आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होत नाही.. तरी शक्य ती अपादग्रसतांना आवश्यक ती मदत करणे..व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे,आणि त्याचे निराकरण करणे म्हणजे ‘आपत्ती व्यवस्थापन’ होय.
हे सर्व आपण जाणताच..
परंतु हे फक्त क्रमिक पुस्तकात न वाचता ते कृतीत आणण प्रत्येक भारतीयाच कर्तव्य आहे.. यात तिळमात्र शंका नाही.. परिस्थिती कोणतीही असो प्रामाणिक पणा, सामाजिक जाण,योग्य नेतृत्व, आणि सर्वात महत्वाचे..
निःस्वार्थ सेवा.. या सर्व गुणांचा त्रिवेणी संगम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन संघ संचालित आमची. Disaster Rescue force आणि मला याचा अभिमान आहे याच नेतृत्व करण्याचं काम मी गेली दहा वर्ष प्रामाणिक पणे करत आहे.